बायको व्हिडीओ कॉल वर रडत होती, योगेश केदार यांची फेसबुक वरील भावनिक पोस्ट

बायको व्हिडिओ call वर रडत होती. मी म्हटलं, अगं रडायला काय झालं? हुंदके देत ती बोलत राहिली. येत्या दहा बारा दिवसांत आपलं बाळ येईल. गरज असताना देखील गेले अडीच तीन महिने तुम्ही मला वेळ दिला नाही. लोकांना तुम्ही एक महिनाभर चालत असलेले दिसलात. पण गेले दोन अडीच वर्ष तुम्ही ही मराठा वनवास यात्रेची संकल्पना बाबत अनेकांशी चर्चा करत होता. तसेच ओबीसी आरक्षण मागणीवर दिवसरात्र अभ्यास अन् काम करत असलेले मी बघितले आहे. रात्री झोपेत देखील कधी बडबडलात तरी ओबीसी आरक्षण म्हणत असायचा. माझे पैसे तर संपवलेच पण लोकांकडून पैसे उसने घेऊन तुम्ही यासाठी खर्च केले. मला पैश्याचं काहीच वाटत नाही. पण एवढं सगळं करून भर उन्हात चालत मुंबई जवळ पोचलात अन् आजारी पडलात. तुम्ही हॉस्पिटल मध्ये admit आहात याचे वाईट वाटत आहे. बाकी काही नाही.

 

आमच्यावर अन्याय करून तुम्ही समाजासाठी जगता आहात. तुमच्या या त्यागाची दखल कोण घेणार आहे का? एक दिवस समाज सर्व विसरून जाईल. तसेही माणूस मेल्यावराच हा समाज उदो उदो करतो. तुम्हाला काही बरे वाईट झालेच तर समाजाचे काहीच नुकसान होणार नाही. पण आमचं मात्र सर्वस्व हरवेल. त्यामुळे तुम्ही इथून पुढे तुम्ही निवांत राहा. मी आयुष्यभर तुमचा सांभाळ करीन. पण तुम्ही दगदग करू नका.

 

मी म्हणालो, आपण देवाला साक्षी ठेऊन कार्य करीत राहू. आपला लढा हा सत्याचा आहे, मराठ्यांच्या येणाऱ्या शेकडो पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन….. कर्म करताना फळाची अपेक्षा करायची नसते. मग लोकांच्या कौतुकाची देखील अपेक्षा आपण का करावी? त्यामुळे बिंधास राहा. तसेही आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत. मातीत बी पेरणी करणारे आहोत. पीक देखील नक्की येतेच. त्याच प्रमाणे आपण विचारांची पेरणी करत पुढे जायचं. सगळं सुरळीत होईल. मी देखील लवकरच मराठा वनवास यात्रेत सहभागी होऊन. आपल्या मित्रांना ती यात्रा पुढे न्यायला सांगितली आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही.

 

योगेश केदार ( मराठा वनवास यात्रा)

9823620666

वरील पोस्ट योगेश केदार यांच्या फेसबुक पेज वरून कॉपी केलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top