Bondhar gao nanded district: बोंढार गावात आणि जिल्ह्यात मराठा समाज भीतीच्या आणि दडपणाच्या वातावरणात आहे

प्रती,

मा जिल्हाधिकारी साहेब

जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

 

विषय : बोंढार गावात आणि जिल्ह्यात मराठा समाज भीतीच्या आणि दडपणाच्या वातावरणात आहे. बाहेरील लोक येऊन, झालेल्या घटनेला जातीय वळण देत मराठा समाजाच्या भावना दुखावत आहेत. त्यांच्यावर आय पी सी ऍक्ट खाली गुन्हे दाखल करणे बाबत..

 

महोदय,

वरील विषयानुसार मागील 8 दिवसांपूर्वी बोंढार येथे जी दुर्दैवी घटना घडली त्याबद्द्ल मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाने निषेध व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यातील वातावरण अतिशय सलोख्याचे राहावे म्हणून प्रयत्न करत असतांना सुद्धा बहुजन विचाराच्या नावाखाली बाहेरील नेते येऊन अतिशय खालच्या स्तरावर मराठा समाजावर आरोप करत आहेत त्यामुळे गावातील गावकरी आणि संबंध मराठा समाज भीतीच्या वातावरणात जगत आहेत. प्रामुख्याने शेती हा व्यवसाय असणारे गावातील लोकांना धमकावत आहेत पुढे पेरणीचा काळ असून गावातील लोकांनी स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. त्या लोकांवर गुन्हे दाखल करावेत ही विनंती. बहुजनवादी नेत्याच्या अवास्तव मागण्या बघून पोलीस प्रशासन पण दडपणाखाली दिसत आहे.

तरी आमची एकच विनंती आहे की जो Fir लिहला गेला त्यात खरंच सत्य आहे का? की बनावट कथा आहे ? ते पोलीस अधिकारी/ तपास यंत्रणा ह्यांनी सखोल चौकशी करावी. व त्यानुसार जे कलम लावले आहेत आणि आरोपी चे नाव आहेत त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही कलम लाऊन दुसऱ्या निष्पाप लोकांना गोवण्याचा प्रयत्न होऊ नये, मराठा समाजातील लोकप्रतिनिधी मग ते आमदार असतील खासदार असतील किंवा कुठल्याही पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील ते फक्त मराठा आहेत म्हणुन त्यांच्यावर अतिशय खालच्या थरावर जाऊन बोलणे हे थांबले पाहिजे.ही विनंती. तसे काही झाल्यास पुढील परिणामस प्रशासन जबाबदार असेल. मराठा शांत आहे, संत नाही.

मा जिल्हाधिकारी ह्यावर विशेष लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

 

सगळे आपलेच,

मराठा क्रांती मोर्चा, नांदेड जिल्हा

वरील पोस्ट Santosh Shinde यांच्या फेसबुक वरून घेतलेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top